गावाविषयी माहिती
ग्रुप ग्रामपंचायत चिखले - सावरखांड- गोळेघर ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे. सदर ग्रामपंचायत मध्ये चिखले, सावरखांड आणि गोळेघर अशी तीन महसूल गावे समाविष्ट आहेत .
१. चिखले ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते,पिनकोड 421312 आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे 8.50 किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे 54 किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत आदिवासी बहुल असून नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते.
२. २०११ च्या जनगणनेनुसार 1943 लोकसंख्या आहे ,हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते.
३. जे मुख्यत्वे आदिवासी लोकवस्तीचे असून, वाडा तालुक्याच्या दक्षिणेकडील भागात येते.
मुख्य माहिती:
सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची लोकसंख्या सुमारे 1943 आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3 , अंगणवाडी केंद्रे 5 , तसेच समाजमंदिर-३ अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच लघु नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिखले गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर, गावदेवी मंदिर, तापी माता मंदिर आहे. सावरखांड गावात हनुमान मंदिर व गावदेवी मंदिर आहे तसेच गोळेघर गावात गावदेवी मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात.
चिखले ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चिखले, सावरखांड, गोळेघर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.
ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
चिखले ग्रामपंचायत आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.